तुळजाराम चतुरचंद महविद्यालयात वार्षिक क्रीडा नैपुण्य पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
आपले कुटूंब, गाव व महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करा.”
तुळजाराम चतुरचंद महविद्यालयात वार्षिक क्रीडा नैपुण्य पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
आपले कुटूंब, गाव व महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करा.”
बारामती वार्तापत्र
येथील तुळजाराम चतुरचंद महविद्यालयाच्या जीवराज सभागृहात वार्षिक क्रीडा नैपुण्य पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला.
डॉ.दीपक माने, संचालक विद्यापीठ क्रीडा मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य मा.श्री.चंद्रगुप्त शहा वाघोलीकर होते. अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे सदस्य सत्यजित शहा पंदारकर, डॉ.जयप्रकाश शहा वडूजकर हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ.दीपक माने म्हणाले की क्रीडा क्षेत्र इंडस्ट्री म्हणून येणा-या काळामध्ये उदयाला येत आहे. करियर करण्यासाठी योग्य असे हे क्षेत्र आहे.
विद्यार्थ्यांनी आयुष्याची दिशा आताच ठरविली पाहिजे. स्थित्यंतरांना सामोरे जायचे असेल तर शरीर, मन सुदृढ राखणे आवश्यक आहे. यासाठी खेळाचे क्षेत्र अत्यंत महत्वाचे आहे. अनेक संधी क्रीडा क्षेत्रामध्ये आहेत. विद्यार्थ्यांनी वेळीच त्याचा फायदा घेतला पाहिजे.
मा.श्री.चंद्रगुप्त शहा वाघोलीकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, आज क्रीडा क्षेत्राकरिता जेवढया सुविधा उपलब्ध आहेत तितक्या पूर्वी नव्हत्या. महाविद्यालयाने क्रीडा क्षेत्रात केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रगती करावी.
जेजे चांगले आहे ते ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे आहे. आपले कुटूंब, गाव व महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करा.”
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व पारितोषिके देवून गौरविण्यात आले.
महाविद्यालयाबरोबरच मा.प्राचार्य, उपप्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.गौतम जाधव यांनी अहवाल वाचन केले. प्रा.अशोक देवकर यांनी पारितोषिक वितरण वाचन केले.
तर सूत्रसंचालन प्रा.संजय शेंडे यांनी केले. प्रा.राजेंद्र आगवणे यांनी आभार मानले.
या समारंभासाठी सर्व उपप्राचार्य, रजिस्ट्रार, विद्यापीठ प्रतिनिधी, क्रीडा प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच प्राध्यापक, शिक्षक, या कार्यक्रमास शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.