तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये प्रवेशद्वार सुरक्षा ट्रायपॉड प्रणाली व नवीन रस्त्याचे उदघाटन संपन्न
एकूण ३० लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये प्रवेशद्वार सुरक्षा ट्रायपॉड प्रणाली व नवीन रस्त्याचे उदघाटन संपन्न
एकूण ३० लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले.
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये प्रवेशद्वार सुरक्षा ट्रायपॉड प्रणाली व नवीन रस्त्याचे उदघाटन अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) यांचे शुभहस्ते व सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), खजिनदार विकास शहा (लेंगरेकर) , बांधकाम समिती चेअरमन करण शाह (वाघोलीकर) व संस्थेचे विश्वस्त यांचे उपस्थितीत संपन्न झाले. संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) यांनी सांगितले की, आता विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व अन्य व्यक्तींना स्वयंचलित प्रवेश नियंत्रण प्रणालीमध्ये चेहरा ओळखीद्वारे नोंद करूनच महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार आहे.
या प्रणालीचा फायदा महाविद्यालयामध्ये शिस्त राखण्यासाठी होईलच तसेच बाहेरच्या अन्य व्यक्तींना कामाशिवाय महाविद्यालयामध्ये प्रवेश करता येणार नाही. विद्यार्थी व महिलांच्या सुरक्षेसाठी संस्थेने हा निर्णय घेतला व त्वरेने त्याची अंमलबजावणी केली असून यासाठी एकूण ३० लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले.
तसेच मुलींच्या वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावर देखील सदर सुरक्षा ट्रायपॉड यंत्रणा संस्थेने बसविली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी याचा फायदा होणार आहे.
त्याचप्रमाणे महाविद्यालयातील कॉन्क्रीटचा रस्ता देखील नव्याने तयार करण्यात आला आहे.. यासाठी देखील अंदाजे पावणेदोन कोटी रुपये खर्च केले आहेत असे करण शाह वाघोलीकर, बांधकाम समिती चेअरमन यांनी सांगितले. रस्ता नूतनीकरणाच्या कामी करण शाह वाघोलीकर यांचे मोलाचे योगदान लाभले.
महाविद्यालयामध्ये इ. ११ वी ते पदव्युत्तर पर्यंत एकूण १०००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच ६०० प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. १९६२ रोजी स्थापन झालेली अनेकान्त एज्युकेशन सोसायटी नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रयत्नरत असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांना सुलभपणे शिक्षण घेता येईल यासाठी प्रयत्नरत असल्याचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी सांगितले. याप्रसंगी संस्थेचे सदस्य चंद्रगुप्त शाह (वाघोलीकर), सत्यजित शहा (पंदारकर), सोनिक शहा (पंदारकर), महावीर शहा, डॉ.राजेंद्र ढाकाळकर, ऍड.बकुल दोशी, डॉ.जे.जे.शहा, स्वरूप शहा, धवल शहा, सोहम शहा, मिश्रीलाल टाटीया, डॉ.राजेंद्र मुथा, जयंत किकले, मिलिंद अत्रे, उपप्राचार्य, रजिस्ट्रार, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी इ. उपस्थित होते.