तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
महाविद्यालयातील सर्व विभागांनी दिवसभर वेगवेगळे उपक्रम सादर करून या दिनाचा उत्साह वाढविला.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
महाविद्यालयातील सर्व विभागांनी दिवसभर वेगवेगळे उपक्रम सादर करून या दिनाचा उत्साह वाढविला.
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील विज्ञान मंडळ, पदार्थ विज्ञान विभाग व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.जे.व्ही.याखमी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
यावेळी डॉ.याखमी यांनी आपल्या देशातील विज्ञानाची सद्यस्थिती व नामांकित वैज्ञानिकांचे विज्ञानातील योगदान यावर सखोल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी भविष्यात नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठी करावयाचे प्रयत्न यावर सखोल मार्दर्शन केले.
प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर यांनी प्रास्ताविक करताना दैनंदिन जीवनात विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. डॉ.शिवाजी पवार यांनी अध्यक्षीय भाषणात संशोधन आणि तंत्रज्ञान याचे महत्व सांगितले. डॉ.पांडुरंग पिंगळे यांनी व्याख्यात्यांची ओळख
करून दिली व शेवटी विज्ञान मंडळाचे प्रमुख डॉ.योगेश इंदुलकर यांनी आभार मानले.
महाविद्यालयातील सर्व विभागांनी दिवसभर वेगवेगळे उपक्रम सादर करून या दिनाचा उत्साह वाढविला. प्रत्येक विभागाने भित्तीपत्रिका, संशोधन प्रकल्प, नाविन्यपूर्ण प्रतिकृती, प्रात्यक्षिके यांचे सादरीकरण केले. काही विभागांनी प्रश्नमंजूषा व परिसंवाद घेतले. हा दिवस साजरा करत असताना महाविद्यालयातील सर्व शाखांचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.