तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बेसबॉल (पुरुष) स्पर्धेला सुरुवात
महाविद्यालयाने स्पर्धेसाठी केले्ल्या तयारीचे विशेष कौतूक केले.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बेसबॉल (पुरुष) स्पर्धेला सुरुवात
महाविद्यालयाने स्पर्धेसाठी केले्ल्या तयारीचे विशेष कौतूक केले.
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बेसबॉल (पुरुष) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी क्रीडाज्योत प्रज्वलीत करुन स्पर्धेचे उद्घाटन केले. देशभरातून ४० विद्यापीठांचे संघ या स्पर्धेसाठी मैदानात उतरले आहेत.
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी सुमारे ६४० खेळाडू यांचेसह, संघव्यवस्थापक, क्रीडा अधिकारी, मार्गदर्शक, पंच, शारीरिक शिक्षण संचालक सहभागी झाले आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरुमकर यांनी सर्व मान्यवरांचे व खेळाडूंचे स्वागत केले व महाविद्यालयाने आजपर्यंत केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. डॉ.दिपक माने, संचालक, बोर्ड ऑफ स्पोर्टस यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बेसबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना कुलगुरु डॉ. नितिन करमळकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ हा महत्वाचा घटक असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या आहेत. महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल व विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या उपक्रमांबद्दल गौरवोद्गार काढले.
महाविद्यालयाने स्पर्धेसाठी केले्ल्या तयारीचे विशेष कौतूक केले. या स्पर्धेमुळे बारामतीकरांना विविध राज्यांच्या संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळाली असल्याचे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे सचिव श्री मिलिंद शाह वाघोलीकर यांनी बारामतीकर या स्पर्धेना चांगला प्रतिसाद देतील असा विश्वास व्यक्त केला. महाविद्यालयास ही स्पर्धा आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर यांनी विशेष प्रयत्न केले व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बेसबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री मिलिंद शाह (वाघोलीकर) यांनी भूषवले. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
डॉ.दिपक माने, संचालक, बोर्ड ऑफ स्पोर्टस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तसेच महाराष्ट्र बेसबॉल संघटना सदस्य डॉ.सरवदे अशोक, डॉ.काळे ज्ञानेश, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती सचिव डॉ.रमेश गायकवाड, कक्षाधिकारी विद्यापीठ क्रीडा मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे डॉ.मनोहर कुंजीर, डॉ.डेव्हिड पालसे, यूएसए, हे उपस्थित होते.
अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे सदस्य डॉ.राजेंद्र मुथा हे उपस्थित होते. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बेसबॉल स्पर्धेचे समन्वयक आणि महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख गौतम जाधव यांनी आभारप्रदर्शन केले. डॉ. प्रदिपसरवदे आणि प्रा. स्मिता गोरे यांनी सुत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, रजिस्ट्रार, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बेसबॉल स्पर्धेच्या पहिला सामना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विश्वविद्यालय, विलासपूर बिहार, यांच्यामध्ये रंगला. यामध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विश्वविद्यालय, विलासपूर यांनी बाजी मारली. या स्पर्धांचे सामने तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर सुरु आहेत.