तेलगू अभिनेत्री मैथिलीने केला आत्महत्येचा प्रयत्न; तिचे प्राण पोलिसांनी वाचवले
15 दिवसांत चार अभिनेत्रींनी आयुष्य संपवलं आहे.
तेलगू अभिनेत्री मैथिलीने केला आत्महत्येचा प्रयत्न; तिचे प्राण पोलिसांनी वाचवले
15 दिवसांत चार अभिनेत्रींनी आयुष्य संपवलं आहे.
प्रतिनिधी
तेलगू अभिनेत्री आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. 8 कॅन ब्रीझर्स आणि झोपेच्या गोळ्या घेत मैथिलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस मैथिलीच्या घरी पोहोचले आणि तिचे प्राण वाचवले आहेत. ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. सध्या मनोरंजनसृष्टीतून अनेक आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. गेल्या 15 दिवसांत चार अभिनेत्रींनी आयुष्य संपवलं आहे.
मैथिलीने 6 महिन्यांपूर्वी तिच्या पतीविरोधात छळाचा गुन्हा दाखल केला होता. मैथिलीने तिचा पती श्रीधर रेड्डीसह इतर 4 जणांवर तिचा छळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर हे प्रकरण कायदेशीर कारवाईसाठी पाठवण्यात आले आहे.
मंगळवारी मैथिलीने झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलिस तिच्या फोनचे सिग्नल ट्रॅक करत योग्य वेळी अभिनेत्रीच्या घरी पोहोचले. ती तिच्या घरात बेशुद्धावस्थेत आढळली. पोलिसांनी तिला उपचारासाठी निम्स रुग्णालयात दाखल केले. जिथे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.