स्थानिक

त्यांनी दिली अकरा हजार रुपये मदत

शहर पान असोसिएशनच्या वतीने नामदेवराव शिंदे यांच्याकडे सुपूर्द

त्यांनी दिली अकरा हजार रुपये मदत

शहर पान असोसिएशनच्या वतीने नामदेवराव शिंदे यांच्याकडे सुपूर्द

बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलिसांच्या वतीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी लोकवर्गणीतुन मदत करण्याचे आवाहन केले. आणि डॉक्टरांपासून ते मोठमोठ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांनी मदतीची भावना ठेवली. मात्र दैनंदिन व्यवसायातुन बचत करत राहिलेली रक्कम एकत्र करून सुमारे अकरा हजार रुपये समाजासाठी उदात्त हेतूने दयावे म्हणुन बारामती शहर पान असोसिएशनच्यावतीने पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्याकडे 11 हजार रुपयाचा निधी सीसीटीव्ही कॅमेरा साठी देण्यात आला. यावेळी नामदेवराव शिंदे यांनीही पान ठेला व्यवसायिक यांचे कौतुक केले.

या व्यावसायिकांनी आपल्या दैनंदिन प्रपंचातून फूल नाही फुलाची पाकळी केलेल्या मदतीची शहरात आज दिवसभर चर्चा चालु होती.

हा निधी देताना बारामती पान असोसिएशनचे अध्यक्ष सलीम तांबोळी ,उपाध्यक्ष प्रकाश चांदगुडे, सचिव जहागिर तांबोळी, कार्याध्यक्ष रफिक शेख ,सहसेक्रेटरी आक्रम शेख, सदस्य विकास सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!