त्यागमुर्ती रमाई कोट्यावधी लोकांच्या काळजात आई म्हणून कोरली गेली- नानासाहेब सानप
भिमाई आश्रमशाळेत रमाबाई आंबेडकर जयंती साजरी
त्यागमुर्ती रमाई कोट्यावधी लोकांच्या काळजात आई म्हणून कोरली गेली- नानासाहेब सानप
भिमाई आश्रमशाळेत रमाबाई आंबेडकर जयंती साजरी
इंदापूर: प्रतिनिधी
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने रविवारी (दि.७) भिमाई आश्रमशाळेत माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी नानासाहेब सानप बोलत होते.
नानासाहेब सानप म्हणाले की,रमाईचे जीवन उच्च आदर्शांनी ओतप्रोत भरलेले आहे.डॉ.बाबासाहेबांच्या आयुष्यातला अमूल्य वेळ समाजोपयोगी, देशापयोगी व सत्कारणी खर्ची व्हावा म्हणून रमाई स्वतः ला विसरून एका अदृश्य आगीत सतत जळली. बाबासाहेब जगावेगळ्या अस्पृश्यतेविरुध्द लढा देत होते, अशावेळी रमाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. दुःखाने माणसे मोठी होतात हे तिने जाणले होते. “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. रमाई गरीब कुटुंबांतील असूनही महान त्यागाच्या व कारुण्याच्या वैभवाने कोट्यावधी जनतेच्या काळजात आई म्हणून कोरली गेली. असे उद्गार आपल्या भाषणात सानप यांनी काढले.
प्रा. रेश्मा झेंडे म्हणाल्या की,बाबासाहेबांच्या प्रत्येक वाटचालीत रमाईची अर्धांगिनी म्हणून खंबीर साथ होती म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक कार्यात यशस्वी झाले. कार्यक्रमास मुख्याध्यापक साहेबराव पवार , राजेंद्र सोनवणे,राजेंद्र हाळनोर,अधीक्षक अनिल ओहोळ , अनिसा मुल्ला, निता भिंगारदिवे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी, संतोष शिंदे, महावीर गायकवाड, जगदीश कांबळे यांनी परिश्रम घेतले.