त्या धावपटू’ च्या मदतीला धावून आली खाकी वर्दी मधील माणुसकी
"खाकी वर्दी मध्ये सुद्धा माणुसकी असते

त्या धावपटू’ च्या मदतीला धावून आली खाकी वर्दी मधील माणुसकी
“खाकी वर्दी मध्ये सुद्धा माणुसकी असते
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
त्या बारामती मध्ये आल्या धावल्या, आणि जिंकल्या सुद्धा पण नियतीने त्यांचे कुंकू पुसले त्याच वेळी बारामती शहर पोलीस स्टेशन ने माणुसकी दाखवत मदतीचा हात पुढे करून जीवन जगण्यासाठी उभारी दिली.
लता करे या पतीच्या उपचारासाठी बारामती मधील विविध मॅरेथॉन स्पर्धा मध्ये भाग घेऊन विजेत्या ठरल्या होत्या त्यांच्या जीवनावर चित्रपट ही निघाला होता या सर्व घडामोडी मध्ये आर्थिक घडी आता सुरळीत होणार होती परंतु कोरोना च्या महामारीत त्यांचे पतीचे निधन झाले त्यामुळे पुन्हा एकदा नियती जिंकली व लता करे हरल्या होत्या.
आता जीवन जगण्यासाठी पुन्हा एकदा मॅरेथॉन स्पर्धा मध्ये भाग घ्यावा व विजेत्या रक्कम मधून उदरनिर्वाह करावा असा विचार असताना लॉकडाऊन मध्ये कोणतेही कार्यक्रम नाहीत त्यामुळे स्पर्धा होणार नाही हे कळले अत्यंत दुःखी व निराश होऊन या वयात आता धुनी भांडी किंवा एखाद्याच्या शेतात मोल मजुरी साठी प्रयत्न करताना बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना सदर माहिती मिळताच तात्काळ त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतीसाठी हात पुढे केले. मदत करून रीतसर आई समान म्हणून त्यांचा व त्यांच्या जिद्दीचा सन्मान करण्यात आला.
“खाकी वर्दी मध्ये सुद्धा माणुसकी असते हे बारामती शहर पोलिसांनी दाखवून दिले हा सन्मान माझा नसून एका आईचा व धावपटू चा आहे ” असे सत्कार झाल्यानंतर लता करे यांनी सांगितले.
चौकट: पोलिसांची नोकरी करताना समाज्यातील गुणवंत व दुर्लक्षित घटकांचा सन्मान करून माणुसकी साठी खारीचा वाटा उचलण्याचा प्रत्यन प्रामाणिकपणे करणे ही खरी आजची गरज असल्याचे मत बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले.