दत्तात्रय भरणे वाशिमचे पालकमंत्रिपदी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळख 

दत्तात्रय भरणे वाशिमचे पालकमंत्रिपदी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळख

इंदापूर प्रतिनिधी –

राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी (दि. २६) एका पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली आहे. हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातूनसन २०२४ मध्ये दत्तात्रय भरणे हे सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. सन २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम केलेले आहे. शिवाय त्यांनी काही काळ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलेले आहे. ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!