स्थानिक
दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गा माता दौडीची बारामतीत सांगता.
शहारातील प्रमुख भागांत फिरून दौडीचा समारोप
दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गा माता दौडीची बारामतीत सांगता.
शहारातील प्रमुख भागांत फिरून दौडीचा समारोप
बारामती वार्तापत्र
दरवर्षीप्रमाणे यंदाही बारामतीत श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानतर्फे नवरात्रोत्सवात दुर्गा माता दौडीचे आयोजन करण्यात आले होते.
गेले नऊ दिवस भिगवण चौक ते माळावरची देवी मंदिरापर्यंत घोषणांच्या जयघोषात, देशभक्तीपर गीतं म्हणत दौड निघते. (दि:१५) रोजी विजयादशमी दिवशी शहारातील प्रमुख भागांत फिरून दौडीचा समारोप बारामती कसबा येथील शिवाजी महाराज उद्यानात झाला.
भगवे फेटे परिधान केलेले शेकडो जण या दौडीत सहभागी झाले होते. व ठिकठिकाणी दौडीचे स्वागत करण्यात आले. संभाजीराव भिडे गुरूजींच्या मार्गदर्शनखाली बारामतीत गेले २० वर्ष दुर्गा माता दौडीचे आयोजन केले जाते.अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे बारामतीचे प्रमुख संग्रामसिंह जाचक यांनी दिली.