‘आमचे बंधू आज लय जोरात’ ; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या व्यक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला
एखाद्याकडून काम करून घ्यायचे असेल तर त्याला उभा आडवा न करता काम गोडीगुलाबीने करून घेतले पाहिजे.

‘आमचे बंधू आज लय जोरात’ ; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या व्यक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला
एखाद्याकडून काम करून घ्यायचे असेल तर त्याला उभा आडवा न करता काम गोडीगुलाबीने करून घेतले पाहिजे.
बारामती वार्तापत्र
आमचे बंधू आज लय जोरात होते.आपल्याला कुणाकडून काम करून घ्यायची असतील तर त्याच उभं -आडवं करून कसं काम होणार’. काम थोड गोड बोलुन, गोंजरून, एखादा चिमटा काढत, पण सारखं सारखं सगळीकडून चिमटं काढून कसं जमंल, या शब्दात उपमुख्यमंत्री अजितदांदानी बंधू राजेंद्र पवार यांच्या भाषणावर केली टिपण्णी केली. इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमात, ते बोलत होते.
बारामती येथे अटल इनोव्हेशन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी आपल्या प्रास्ताविकामध्ये संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी कृषी महाविद्यालय व कृषी शिक्षणातील काही अडचणींबाबत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पाच बैठका झाल्या मात्र कोणताही निर्णय झाला नाही अशी तक्रार केली. हाच धागा पकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेंद्र पवार यांना ‘आज गडी लय जोरात आहे’ अशा शब्दात कोपरखळी मारली.
अजित पवार यांच्या वक्तव्यवर सभागृहात चांगलीच खसखस पिकली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार व्यासपीठावर उपस्थित होते.यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात हाच धागा पकडत अजितदादा आणि राजेंद्र पवार यांनी तुम्ही दोघांनी आधी ठरवा आणि मग माझ्याकडे या. आपण ते काम करण्याचा प्रयत्न करू. दादांनी आडकाठी आणली तर आपण पवार साहेबांकडे जाऊन ते काम करू असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.