दहा वर्षाची दोन चुलत भावंडे पोहायला गेल्यावर पाण्यात बुडाली, संपूर्ण गावावर शोककळा
दहा वर्षाची दोन चुलत भावंडे पोहायला गेल्यावर पाण्यात बुडाली, संपूर्ण गावावर शोककळा
ही मुले रॅम्पच्या कडेला पोहत होती.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील पिंपळी येथील दगडच्याखाणीत पोहायला गेलेल्या दहा वर्षे वयाच्या दोन मुलांचा आज खाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दोन मुले चुलतभावंडे होती.
देवा तानाजी शिंदे व सम्राट संतोष शिंदे या दोन मुलांचा या घटनेत मृत्यू झाला. दोघेही दगडखाणीत पोहायला गेली, मात्र ती लवकर परतली नाहीत, शोधाशोध केल्यानंतर त्यांचे मृतदेह पाण्यात आढळले त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. ही मुले शेळ्या राखण्यासाठी गेली होती. रोज ही मुले रॅम्पच्या कडेला पोहत होती. मात्र पोहता पोहता खोल पाण्यात गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला
या घटनेनंतर बारामती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कोरोनाच्या लॉकडाऊननंतर आतापर्यंत बारामती व इंदापूर तालुक्यात ही चौथी घटना घडली आहे, यापूर्वी वडापुरी, शेळगाव, निरगुडे या इंदापूर तालुक्यातील चिमुकल्यांचे पाण्यात बडून मृत्यू झाले आहेत. ही चौथी घटना पिंपळीमध्ये घडली.