क्राईम रिपोर्ट

दारुचा ट्रक उलटल्याचे दाखवून लाखोंचा अपहार करणा-या दोघांना बेड्या, ४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई…!

६५ लाख ८७ ( हजार रुपये किंमतीचे बॉक्स

दारुचा ट्रक उलटल्याचे दाखवून लाखोंचा अपहार करणा-या दोघांना बेड्या, ४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई…!

६५ लाख ८७ ( हजार रुपये किंमतीचे बॉक्स

क्राईम; बारामती वार्तापत्र

दारूच्या बाटल्यांची वाहतूक करणा-या ट्रकचा अपघात झाल्याचा बनाव करून लाखो रुपयांचा अपहार करणा-या ट्रकचालक आणि मालकाला बारामती तालुका पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून अपहार केलेला ४० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी
हस्तगत केला आहे. ट्रकचालक अंकुश बेंद्रे आणि मालक अजिनाथ जराड (दोघेही रा.बारामती) असे अटक आरोपीचे नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील युनाटेड स्प्रिंट कंपनीतून गुरुवारी (दि. २८) रात्री ११ च्या सुमारास मॅकडॉल नं १ विस्कीचे दारुचे सुमारे ६५ लाख ८७ ( हजार रुपये किंमतीचे बॉक्स घेऊन ट्रक (एम एच १२ एफसी ६१५० जळगावच्या दिशेने निघाली होती. दरम्यान ट्रक

उंडवडी कप येथे आला असताना पहाटेच्यावेळी ट्रक उलटल्याची माहिती ट्रकलाचालकाने पोलीस ठाण्यात फोनद्वारे दिली. या घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण व गुन्हेशोध पथक घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान मालक अजिनाथ जराड ,अकुंश बेंद्रे (रा बारामती) हे अपघात घडल्याची तक्रार देण्याकरिता पोलीस ठाण्यात पोहचले.

त्यावेळी दोघांच्या बोलण्याचा पोलिसांना संशय आला. त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघेही उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागले. त्यामुळे पोलीसांनी सदर ट्रक कंपनीतून निघाल्यापासून ते रोडचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. सदर फुटेजमध्ये ट्रक भवानीनगरच्या दिशेने घेल्याचे दिसले.

त्यावरुन अधिक तपास केले असता, सत्य समोर आले. चालक व मालकाने संगनमताने त्याचा मित्र नंदकुमार क्षिरसागर (रा. गौंतडी ता. इंदापुर) याच्या मदतीने ट्रकमधील ४० लाख रुपयांची ५०० बॉक्स दारू ही एका गोडावूनमध्ये अपहार करून काढून ठेवून ट्रकचा अपघात झाल्याचे भासवण्याकरीता रस्त्याचे कडेला गाडी उलटवली होती.अपघातानंतर ट्रकमधील दारून स्थानकांनी लांबवल्याची फिर्याद आरोपीनी दिली होती. पोलीसांनी त्यांच्याकडून अपहार केलेल्या ४९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस उपनिरीक्षक
खरात तपास करत आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते ,उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे , पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई खरात गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राहुल पांढरे, नंदु
जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे,चालक पोळीस नाईक सदाशिव बंडगर, पोलिस कॉन्स्टेबल अनिकेत शेळके यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram