दिनांक १९ व २० जुलै रोजी मटन, चिकन,अंडी, मासे इत्यादी दुकाने सुरु.
टाळेबंदीत बारामतीकरांना मिळणार घरपोच मांसाहार.
टाळेबंदीत बारामतीकरांना मिळणार घरपोच मांसाहार अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे..
बाराामती- बारामती शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने १६ ते २३ जुलै पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता मटण, चिकन,अंडी, मासे यासह सर्वच प्रकारची वस्तू व सेवा पुरवणारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.
परंतु दिनांक १९ व २० जुलै रोजी मटन, चिकन,अंडी, मासे इत्यादी दुकाने सुरु ठेवण्याबाबत विविध स्तरातून मागणी होऊ लागल्याने सदर दुकानांना घरपोच सेवा देण्याच्या अटीवर विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून सर्व दुकानदारांना घरपोच सेवा देऊन विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी काढलेल्या आदेशात दिली आहे.
सदर कालावधीत घरपोच सेवा देताना सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांच्याकडे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आरोग्य सेतू ॲपचा उपयोग करावा. ज्यामुळे रोगाच्या संभाव्य लक्षणा विषयी माहिती मिळत असल्याने स्व संरक्षणासाठी त्याचा उपयोग होतो. सदर आदेशाचे पालन न केल्यास विविध कलमान्वये कारवाईस पात्र राहतील असेही आदेशात नमूद केले आहे.