दिनांक 30 रोजी बारामतीमध्ये 28 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 776 वर गेली आहे.
दिनांक 30 रोजी बारामतीमध्ये 28 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 776 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामतीत शासकीय आरटीपीसीआर तपासणीत 28 जण कोरोनाबाधित
काल बारामती मध्ये एकूण 186 जणांचे नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 137 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून अठरा जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत तसेच बारामती शहरातील सतरा व ग्रामीण भागातील 11 अशा 28 जणांचा अहवाल rt-pcr पॉझिटिव आलेला असून इंदापूर व पुरंदर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
बारामतीत काल झालेल्या आरटीपीसीआर शासकीय तपासणीत 28 कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये शिवनगर येथील 65 वर्षीय पूरूष, 62 वर्षीय महिला, 52 वर्षीय महिला, सोनवडी सुपे येथील 19 वर्षीय युवक, बारामती शहरातील श्रीरामनगर येथील 32 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 39 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष, चंद्रमणी नगर येथील तीस वर्षीय पुरुष, सोमेश्वर नगर येथील 50 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, पणदरे येथील 50 वर्षीय महिला, कसबा येथील 13 वर्षीय युवक, देशपांडे हॉस्पिटल येथील 32 वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी येथील 51 वर्षीय पुरुष, शारदानगर येथील 32 वर्षीय पुरूष, बारामती शहरातील 39 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, संघवी पार्क येथील 34 वर्षीय पुरुष, जळोची रोड येथील 35 वर्षीय महिला, कसबा येथील 79 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, लोणी भापकर येथील 32 वर्षीय पुरुष व 36 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 60 वर्षीय महिला व जामदार रोड येथील 42 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील खाजगी दवाखान्यामध्ये उपचार सुरू असलेल्या शहरातील दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली.