बारामतीत गोविंद बाग परिसरात राष्ट्रवादीचं मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन
बारामतीला आलात तर दोन पायांवर परत जाणार नसल्याचा इशारा संबधितांना दिला होता.

बारामतीत गोविंद बाग परिसरात राष्ट्रवादीचं मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन
बारामतीला आलात तर दोन पायांवर परत जाणार नसल्याचा इशारा संबधितांना दिला होता.
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यावेळी बारामतीत १२ तारखेला धडकण्याचे संकेत एसटी कर्मचाऱ्यांकडून शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली असून शरद पवार यांची बदनामी करण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
वेळ पडली तर घरात घुसून मारू आणि दोन पायावर नीट जाऊ देणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलेला असल्यामुळे बारामतीत मंगळवारी नेमके काय नाट्य घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.मोठ्या संख्येने कार्यकर्ते येथे जमा होत आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे.
१२ तारखेला बारामतीत येणारे दोन पायांवर परत जाणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वीच्या निषेध सभेत दिला होता. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी येथील संरक्षणाची जबाबदारी घेत योग्य ती कारवाई करू, आजचे आंदोलन थांबवावे, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याची विनंती केल्यावर चर्चा करुन आंदोलन थांबवत असल्याचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगितले.
चोख पोलिस बंदोबस्त ठेवणार…
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत चोख पोलिस बंदोबस्त ठेवणार आहोत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस कायदेशीर कारवाई करतील – मिलिंद मोहिते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, बारामती.
याप्रसंगी ॲड. सुभाष ढोले, माळेगावचे संचालक योगेश जगताप, राजेंद्र ढवाण, नगरसेवक अमर धुमाळ, सुरज सातव, बिरजु मांढरे, बारामती ऍग्रोचे संचालक राजेंद्र देशपांडे, खादी ग्रामोद्योग माजी अध्यक्ष गणेश शिंदे, अॅड. धीरज लालबीगे, राहुल जाधव, श्रीकांत जाधव, प्रवीण मोरे, पार्थ गालिंदे, सागर खलाटे, योगेश जाधव आदी उपस्थित होते.