सणसर गावच्या सरपंच पदी रणजीत निंबाळकर व उपसरपंचपदी राजश्री गुप्ते
सणसर ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची झाली होती.

सणसर गावच्या सरपंच पदी रणजीत निंबाळकर व उपसरपंचपदी राजश्री गुप्ते
सणसर ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची झाली होती.
बारामती वार्तापत्र
इंदापुर तालुक्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून व इंदापूर तालुक्याच्या राजकारणात वेगळे अस्तित्व असणारी ग्रामपंचायत म्हणून सणसर ग्रामपंचायतीचे नाव आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक ॲड रणजीत भैय्या निंबाळकर यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली तर उपसरपंच पदी राजश्री नवनाथ गुप्ते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सणसर ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची झाली होती. मात्र विरोधी पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही व राष्ट्रवादी पुरस्कृत महाविकासआघाडी पॅनल ला 13 जागा मिळून एक हाती सत्ता ग्रामस्थांनी दिली तर चार अपक्ष उमेदवारही या निवडणुकीत निवडून आले होते. चारही अपक्ष उमेदवारांनी सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीला आपला पाठिंबा दर्शविला त्यामुळे ही निवड बिनविरोध झाली.
ॲड रणजीत भैय्या निंबाळकर यांनी यापूर्वीही सणसर चे सरपंचपद भूषविले होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे करण्यात आली होती. सणसर गावचा चेहरा–मोहरा बदलण्यासाठी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन विकासकामांना प्राधान्य दिले जाईल. गाव वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी सतत प्रयत्नशील असणार आहे. नागरिकांनी टाकलेला विश्वास सार्थ करून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात येईल.
ॲड रणजीत निंबाळकर नवनिर्वाचित सरपंच, सणसर