दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला इंदापूर तालुका काँग्रेस चा पाठिंबा
प्रशासनाला दिले लेखी निवेदन
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
केंद्राच्या नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांमध्ये उठावाची भावना निर्माण झाली आहे.शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने दिल्लीत एकवटले आहेत. सुरुवातीला या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला. कडाक्याच्या थंडीत सुद्धा त्यांच्यावर पाण्याचे फवारे, अश्रुधूरांच्या नळकांड्या आणि लाठी हल्ला या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या आणि अत्यंत अमानुषपणे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केला. तरी निर्धाराच्या जोरावर हे सर्व शेतकरी आपापल्या मागण्यांवर ठाम आहेत. या संदर्भात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी फार मोठे आंदोलन उभे केलेले आहे.
या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात कांग्रेस पक्षाने आंदोलन पुकारले असून इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील आज दि.३ रोजी पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या नेतृत्वात तहशील कचेरी आवारात आंदोलन करण्यात आले. तसेच या बिलाला विरोध दर्शवत लेखी निवेदनही तहसील प्रतिनिधी यांना देण्यात आले.
या वेळी तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत, झाकीर काझी, निवास शेळके, प्रदीप शिंदे, चमनभाई बागवान, भगवान पासगे, राहुल आचरे, संतोष अरडे,संतोष शेंडे, तुषार चिंचकर,राहुल जाधव,श्रीनिवास पाटील,विपुल भिलारे,गोविंद खटकदौंड, अतुल जाधव, सुफियानखान जमादार, मिलिंद साबळे, नइम शेख , आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्तिथ होते.