दिल्ली प्रजासत्ताक परेडमध्ये ओंकार वाघोले चे यशस्वी संचलन
ओंकार वाघोले याचे महत्त्वाचे योगदान आहे.
दिल्ली प्रजासत्ताक परेडमध्ये ओंकार वाघोले चे यशस्वी संचलन
ओंकार वाघोले याचे महत्त्वाचे योगदान आहे.
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचा (एन.सी.सी) विद्यार्थी सिनिअर अंडर ऑफिसर ओंकार वाघोले याची २६ जानेवारी, दिल्ली येथील प्रतिष्ठीत आर. डी. सी.कॅम्प साठी निवड झाली त्याने हि परेड यशस्वीरित्या पूर्ण केली. तसेच 28 जानेवारी रोजी
झालेल्या पंतप्रधान रॅलीमध्ये त्याने महत्वपूर्ण सहभाग नोंदवला.
तृतीय वर्ष कम्प्युटर सायन्सचा हा विद्यार्थी असून त्याची एन सी सी मधून 15 सप्टेंबर2021 रोजी महाविद्यालयीन स्तरावर आरडीसी कॅम्प साठी निवड करण्यात आली. पुणे ग्रुप हेडकॉटर येथे टेबल ड्रिल मध्ये ओंकार वाघोले याने गोल्ड मेडल मिळवले त्यातूनच पुढच्या
कॅम्पसाठी निवड झाली.
त्याने इंटर ग्रुप कॉम्पिटिशन कॅम्प मध्ये परेड कमांडर म्हणून महत्वाची जबाबदारी पार पडली. त्यानंतर आरडीसी कँप सिलेक्शन साठी कॅट-1 कॅट -2,कॅट -3 आणि कॅट-4 या कॅम्प निवड प्रक्रिये मधून शेवटी दिल्ली येथे होणाऱ्या रिपब्लिक डे कॅम्प साठी त्याची निवड
झाली. भारतातून आलेल्या एनसीसी छात्रांमधून 100 छात्र, राजपथ परेड साठी निवडले जातात.
यामध्ये ओंकारची निवड करण्यात आली. तसेच 28 जानेवारी रोजी पंतप्रधान रॅलीमध्ये देखील या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या वर्षी महाराष्ट्र संचालनालय पंतप्रधान बॅनरप्राप्त झाला.
यामध्ये ओंकार वाघोले याचे महत्त्वाचे योगदान आहे. या विद्यार्थ्यांला महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी लेफ्टनंट विवेक बळे यांनी मार्गदर्शन केले.
या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरुमकर, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, सर्व उपप्राचार्य, रजिस्ट्रार यांनी अभिनंदन केले.