दिवाळी निमित्त शरद पवार यांचे उपस्थितीत बारामतीमध्ये भव्य व्यापारी परिसंवाद उद्या होणार
आचासंहिते मुळे कार्यक्रम वेळेवर चालू होईल

दिवाळी निमित्त शरद पवार यांचे उपस्थितीत बारामतीमध्ये भव्य व्यापारी परिसंवाद उद्या होणार
आचासंहिते मुळे कार्यक्रम वेळेवर चालू होईल
बारामती वार्तापत्र
मंगळवार दि.5 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता श्री महावीर भवन, भिगवन चौक, बारामती येथे बारामती व्यापारी महासंघ आणि दि मर्चंट असोसिएशन बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने पद्मविभूषण मा. ना. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत दिवाळी निमित्त व्यापारातील घडामोडी संदर्भात “भव्य व्यापारी परिसंवाद” आयोजित केला आहे.
या चर्चासत्रामध्ये मा.खासदार सुप्रिया ताई, मा.योगेंद्र पवार उपस्थित राहणार आहेत.
सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या चर्चासत्रात सहभागी व्हावे व याचा लाभ घ्यावा.
आचासंहिते मुळे कार्यक्रम वेळेवर चालू होईल, सर्व व्यापाऱ्यांनी लवकर यावे.
बारामती व्यापारी महासंघ,दि मर्चंट असोसिएशन बारामती.