दिव्यांगांना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील: संभाजी होळकर
२१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात

दिव्यांगांना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील: संभाजी होळकर
२१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात
बारामती वार्तापत्र
दिव्यांगांच्या वैयक्तिक सामुहिक ,सक्षमीकरणासाठी व सामाजिक विकासासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून राज्यात मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात येते. उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून हजारो दिव्यांगांसाठी आवश्यक साहित्यांचे वाटप करण्यात येत असते. शासकीय योजनांपासुन वंचित राहिलेल्या दिव्यांगांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले.
बारामतीत जिल्ह्यातील दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी दिव्यांग सेलची बैठक पार पडली. यावेळी संभाजी होळकर बोलत होते.
दिव्यांगाला शासकीय योजनेचा लाभ मिळावा तसेच २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी हातभार लावणे आवश्यक आहे.बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष सहायता केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.
यामुळे बारामती तालुक्यासह पुरंदर,दौंड आणि इंदापूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन या पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र देण्याची सोय झाली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन होळकर यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी पुष्पा गोसावी यांची निवड झाल्या बाबत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनवान वदक,महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे उपाध्यक्ष मिलिंद साळवे, जिल्हा अध्यक्षा पुष्पा गोसावी,कार्याध्यक्ष विश्वास शितोळे, जिल्हा सरचिटणीस ऋषिकेश बोत्रे,दौंड तालुका अध्यक्ष मर्लिंग कलपनूर,बारामती तालुका सोशल मिडिया चे अध्यक्ष सुनिल बनसोडे,उपाध्यक्ष विजय थोरात, हरी जाधव,लहू भिलारे,मनोज कुंभार, सुनील जाधव,दत्तात्रय नामदास आदी उपस्थित होते.