दिव्यांग आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी आता घराजवळच्या केंद्रावर लस घेता येणार; केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
ती शिफारस आता केंद्राने मान्य केली

दिव्यांग आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी आता घराजवळच्या केंद्रावर लस घेता येणार; केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
ती शिफारस आता केंद्राने मान्य केली
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
दिव्यांग आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुलभ करण्यासाठी आता आणखी एक पाऊल उचलण्यात येत आहे. दिव्यांग आणि ज्यांचं अद्याप लसीकरण झालं नाही किंवा ज्यांनी आतापर्यंत केवळ पहिला डोस घेतलाय अशा 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी आता त्यांच्या राहत्या घराजवळच लसीकरण केंद्र उभारण्याची सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिली आहे.
नॅशलन एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड 19 या समितीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिव्यांग आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी निअर टू होम कोविड वॅक्सिन सेंटर (NHCVC) उभारण्याची शिफारस केली होती. ती शिफारस आता केंद्राने मान्य केली असून सर्व राज्यांना निअर टू होम कोविड वॅक्सिन सेंटर सुरु करण्याची सूचना दिली आहे.
निअर टू होम कोविड वॅक्सिन सेंटर (NHCVC) साठी पात्र नागरिक
1. 60 वर्षापरील सर्व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, ज्यांचं अद्याप लसीकरण झालं नाही किंवा एक डोस घेतला आहे.
2. सर्व दिव्यांग नागरिक