कोरोंना विशेष

सावधान! करोनारुग्णांच्या संख्येत वाढ,राज्य सरकारने जारी केल्या या महत्वाच्या सूचना

 जगात कोरोनाचा उद्रेक कमी झालाय परंतू चीन व इतर काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतांना दिसतो आहे

सावधान! करोनारुग्णांच्या संख्येत वाढ,राज्य सरकारने जारी केल्या या महत्वाच्या सूचना

जगात कोरोनाचा उद्रेक कमी झालाय परंतू चीन व इतर काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतांना दिसतो आहे

मुंबई :प्रतिनिधी

राज्यामध्ये करोनारुग्णांच्या संख्येमध्ये थोडी वाढ दिसत असल्याने, सरकारच्या आरोग्य विभागाने वेळीच खबरदारी घेत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. मास्क घालणे ऐच्छिक असले, तरी करोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सिनेमागृहे, सभागृहे, कार्यालयांधील बंदिस्त ठिकाणी, तसेच सार्वजनिक ठिकाणांवर मास्क घालणे आवश्यक आहे. त्याच वेळी, करोना चाचण्यांची संख्या कमी झाल्याने ती वाढवावी. हे प्रमाण सध्या असलेल्या चाचण्यांपेक्षा दुप्पट करावे, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

गेल्या सात दिवसांतील रुग्णसंख्या

जिल्हा ४ ते १० मे २७ एप्रिल ते ३ मे वाढ

मुंबई ८४४ ६३७ ३२.५०,पुणे २८१ २२२ २६.५८,ठाणे १७० ११४ ४९.१२,रायगड २४ २६ ७.६९,अहमदनगर १८ १७ ५.८८,पहिले पाच जिल्हे १,३३७ १,०१६ ३१.५९,राज्य १, ४४७ १,०९७ ३१.९१

सरासरीपेक्षा अधिक साप्ताहिक पॉझिटिव्हिटी

बुलडाणा – २.२३,औरंगाबाद – २.१२,मुंबई – १.७९,पुणे – १.६५,नांदेड – १

राज्याची साप्ताहिक पॉझिटिव्हिटी – एक टक्का

रेल्वे प्रशासनाचेही आवाहन

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना रूग्णांची आकडेवारील वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता धोका टाळण्यासाठी प्रवासात मास्क वापरावा असे आवाहन रेल्वे प्रशासनानेही केले आहे.

रजेवरील कैद्यांना नोटीस

संपूर्ण राज्यात जवळपास 12 हजार कैदी कोरोनाच्या रजेवर आहेत. कोविड निर्बंधांना 1 महिना उलटून गेल्यानंतर राज्यसरकारने रजेवर असलेल्या सर्व कैद्यांना हजर होण्याची नोटीस पाठवली. नोटीस मिळाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांत सर्व कैद्यांना वेळेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता ते पुन्हा कारागृहात परतणार की नाही? याविषयी अनेक तर्क वितर्क केले जात आहेत.

ऑपरेशन मालेगाव मॅजिकला यश

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर राज्यात अनेक ठिकाणी सर्वे करणयात आले होते. ऑपरेशन मालेगाव मॅजिक द्वारे केलेल्या सर्व्हेमध्ये मालेगाव अव्वलस्थानी आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मालेगावमध्ये कोरोनाचा कहर झाल्यानंतरही मालेगावच्या नागरिकांमध्ये 96 टक्के दांडगी रोग प्रतिकार शक्ती असल्याचं या सर्वेमधून समोर आलं आहे. आजपासून पुन्हा एकदा दुसरा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!