दुःखाचा डोंगर,बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेलेल्या,आमदाराच्या मुलासह वर्धा मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू!

नीरज चौहान हा कार चालवत होता.

दुःखाचा डोंगर,बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेलेल्या,आमदाराच्या मुलासह वर्धा मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू!

नीरज चौहान हा कार चालवत होता.

प्रतिनिधी

वर्ध्याच्या सेलसुरामध्ये एका चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी होते. त्यांच्या परीक्षा झाल्यामुळे ते पार्टी करण्यासाठी ते देवळीवरून वर्ध्याला येत असताना हा अपघात झाला. अचानक चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरून खाली कोसळली. या अपघातात गाडीतील सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये भाजप आमदार विजय राहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांचाही समावेश आहे.

सर्व विद्यार्थी हे महाराष्ट्राबाहेरील असल्याचं कळतंय. सर्व मेडिकलचे विद्यार्थी असून ते एमबीबीएसचं शिक्षण घेत होते. वेगवेगळ्या वर्गात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांची कार नदीच्या पुलावरुन चाळीस फूट खोल दरीस कार कोसळून अपघात झाला होता.

अपघातातील मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावं

आविष्कार रहांगडाले, आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा
नीरज चौहान, प्रथमवर्ष एमबीबीएस
नितेश सिंग, 2015, इंटर्न एमबीएएस
विवेक नंदन 2018, एमबीएबीएस फायनल पार्ट1
प्रत्युश सिंग, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2
शुभम जयस्वाल, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2
पवन शक्ती, 2020एमबीबीएस फायनल पार्ट 1

अपघात कसा घडला?

देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ मेडिकल विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात झाला आहे. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून कार थेट खाली कोसळली. तब्बल 40 फूट उंचीवरुन विद्यार्थ्यांची कार खाली पडल्याने सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील सर्व मृत विद्यार्थ्यांचं वय 25 ते 35 च्या दरम्यान असल्याचं कळतंय. मध्यरात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, अपघातानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं बचावकार्यास सुरुवात केली होती.

तब्बल चार तास बचावकार्य

या अपघातानंतर विद्यार्थ्यांचा कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठीही तब्बल चार तासांचा अवधी लागला. यानंतर पोस्टमॉर्टेमसाठी विद्यार्थ्यांचे मृतदेह पाठवण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची ओळखही पटली असून आता विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेनं अपघातातील सर्व मृत तरुणांच्या कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.

सगळ्यांची ओळख पटली

या अपघातात ठार झालेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आलं आहे. नीरज चौहान हा कार चालवत होता. त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात घडल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान , आता सर्व विद्यार्थ्यांची ओळख पटली असल्याचीही माहिती सावंगी मेडिकल कॉलेजच्या ओएसडींनी दिली होती. हे सर्व विद्यार्थी एमबीबीएसचं शिक्षण घेत होते. आपला मुलगा भविष्यात डॉक्टर होणार आहे, असं स्वप्न सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिलं होतं. मात्र सोमवारच्या काळरात्री या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. दरम्यान या अपघातातील सातही विद्यार्थ्यांच्या मृत्यूनं संपूर्ण मेडिकल कॉलेजही हादरुन गेलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram