दुकानफोडी चोरी करणारा तुषार सोनवणेसह एक आरोपी गजाआड.
पोलीस उपअधिक्षक नारायण शिरगावकर व पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई.
दुकानफोडी चोरी करणारा तुषार सोनवणेसह एक आरोपी गजाआड.
पोलीस उपअधिक्षक नारायण शिरगावकर व पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई.
बारामती: शहर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे गणेश भाजी मंडई इमारत गाळा नं.एफ एफ 104, ता.बारामती, जि.पुणे बारामती येथील कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडुन त्यातील माल व रोख रक्कम चोरी करून चोरून नेलेबाबत बारामती शहर पोलीस स्टेशनला दि.6 मे 2020 रोजी दुकानफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याप्रमाणे गुन्ह्यातील गेलेला मालाचा व अज्ञात आरोपींचा शोध बारामती शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने चालू केला. बारामती शहर व शेजारील गावामध्ये शोध घेवून एक आरोपीस ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता सदर आरोपी तुषार मारूती सोनवणे (वय-19 वर्षे, रा.बारामती आमराई कोअर हाऊस, ता.बारामती, जि.पुणे) व संग्राम साळुंखे (रा.बारामती आमराई वडकेनगर, ता.बारामती, जि.पुणे) (फरारी) यांनी गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांचेकडून तपासादरम्यान 29 हजार 100 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्याचे पुरावे कामी जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, योगेश शेलार, सहा.फौजदार संदिपान माळी, पो.कॉ.पोपट नाळे, राजेश गायकवाड, सिद्धेश पाटील, पोपट कोकाटे, सुहासलाटणे, अंकुश दळवी, दशरथ इंगवले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी यांनी केली.