
दुचाकी चोर भिगवण पोलिसांनी केले जेरबंद
पोलिसांनी नऊ मोटारी केल्या हस्तगत
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना मोठ्या शिताफीने जेरबंद करून त्यांकडून ४ लाख १० हजार किंमतीच्या ९ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
भिगवन पोलीस स्टेशन हद्दीत मोटरसायकल चोरीबाबत गुन्हे दाखल होते.पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचत नितीन पोपट लोंढे (रा.खुडूस, जि. सोलापूर) ,अनिल अंकुश काळे ( रा.वेळापूर) , राजू उर्फ आप्पा मोहन चव्हाण (रा.सिन्नर फाटा,नाशिक ) या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी भिगवण,हडपसर, लोणी काळभोर,लोणावळा शहर,नारायणगाव अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली आहे.
सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील, सहाय्यक फौजदार श्री.काळभोर, पोलीस हवालदार श्री.वाघमारे,पोलीस नाईक संदीप पवार,पोलीस कर्मचारी महेश उगले,अंकुश माने यांनी केली आहे.