दुधाचा दर लिटरला दोन रुपये वाढणार
खाजगी व सहकारी दूध संघांनी दुध दर वाढवून दिला पाहिजे
बारामती वार्तापत्र
ग्रामीण भागात दुधामुळे सामान्य माणसाला माणसाचे अर्थकारण चालते छोट्या मोठ्या गरजा या दूध धंद्यातून भागवल्या जातात मात्र खर्चाच्या आणि कष्टाच्या तुलनेत या दूध धंद्यातून शेतकऱ्याला विशेष असे काहीच मिळत नाही हेही तितकेच खरे
बारामती तालुका सहकारी दुध उत्पादक संघाने दुधाच्या खरेदी दरात दोन रुपये प्रति लिटर वाढ केली आहे त्यामुळे गाईच्या दुधाचा दर ( फॅट प्रमाणे ) प्रतिलिटर 29 रुपये करण्यात आला आहे.
दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी सांगितले की 3.5 /8.5 या फॅट साठी हा दर राहणार असून वाहतूक आणि कमिशन याच्या व्यतिरिक्त राहणार आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांना या मानकावरील प्रति लिटर दर हा 29 रुपये राहील.
बारामती दूध संघाने जो दर जाहीर केला आहे, तो दर इतरही खाजगी व सहकारी दूध संघांनी दुध दर वाढवून दिला पाहिजे अशी मागणी शेतकरी करत आहेत.
बारामती सह इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यातही दुधाचे मोठ्या प्रमाणावर संकलन केले जाते. गेल्या काही दिवसांपासून दुधाचा दर परवडत नसल्याची दुध उत्पादक सांगत आहे. या पार्श्वभूमीवर बारामती तालुका दूध संघाने दूध उत्पादकांना दिलासा दिला आहे. आता त्याचे अनुकरण इतरही दूध संघ करतात का याकडे दूध उत्पादकांचे लक्ष आहे.