दुध दर मोर्चाप्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी आयोजक अमरसिंह कदम यांच्यासह ४० जणांवर गुन्हा.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दुध दर मोर्चाप्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी आयोजक अमरसिंह कदम यांच्यासह ४० जणांवर गुन्हा.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बारामती वार्तापत्र
दुधाच्या भुकटीच्या आयातबंदी व राज्य सरकारकडून दुध दर दिला जात नसल्याच्या मुद्द्यावरून काल बारामतीत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाप्रकरणी पोलिसांनी शेटटी यांच्यासह ४० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
कोरोनाचा अनलॉकचा काळ सुरू असून जमाव करण्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मनाई आहे, तरीही शेट्टी यांनी मोर्चा काढल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी, अमरसिंह नरसिंग कदम ( रा. हिंगणेवाडी, ता. इंदापूर) विलास विनायक सस्ते ( रा. खांडज ता. बारामती), महेंद्र जयसिंग तावरे (रा. सांगवी, ता. बारामती.) डॉ. राजेंद्र घाडगे (रा. चौधरवाडी ता. फलटण) विकास उर्फ नानजी बाबर (रा. पिंपळी, ता. बारामती), धनंजय महामुलकर (रा. फलटण जि. सातारा), राजेंद्र कदम ( दौंड), बुधम मशक शेख (रा. सणसर, ता. इंदापूर), बाळासाहेब शिपकुले, शिवाजी सोडमिसे ( रा. सोमनथळी, ता. फलटणः) यांच्यासह अनोळखी ४० स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांनी तीन वाहनातून गाई आणल्या होत्या, त्या दाटीवाटीने आणल्या, लोकांच्या तोंडाल मास्क नव्हते, सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही, मोर्चाची परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चा काढण्यात आला. प्रशासकीय इमारतीच्या फाटकासमोर बेकायदा गर्दी जमवून घोषणाबाजी व भाषणे झाली. कोरोनाचा काळ सुरू असूनही जमावाच्या आरोग्यास बाधा येईल असे कृत्य केल्याची फिर्याद पोलिस कर्मचारी ओंकार कैलास सिताप यांनी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.