दुर्दैवी घटना : गोठ्याला आग लागून तीन जनावरांचा जागीच मृत्यू ; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
वडापुरी नजीक हनुमान वाडी या ठिकाणी घडली घटना

दुर्दैवी घटना : गोठ्याला आग लागून तीन जनावरांचा जागीच मृत्यू ; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
वडापुरी नजीक हनुमान वाडी या ठिकाणी घडली घटना
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील वडापुरी नजीक हनुमानवाडी या ठिकाणी गोठ्याला आग लागल्याने तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाला असून चार जनावरे गंभीर जखमी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
हनुमान वाडी येथील गोविंद निंबाळकर यांच्या गोठ्याला शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग लागली. या आगीत तीन जनावरे हे जागीच मृत्युमुखी पडली तर चार जनावरे गंभीर रित्या होरपळलेली आहेत.त्यामुळे निंबाळकर यांचे ५ ते ६ लाखांचे नुकसान झाले आहे.
ही बातमी कळताच या वडापुरी काटी गणाचे जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांनी या ठिकाणी भेट देऊन या शेतकऱ्याला धीर देत प्रशासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळाविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संबंधित शेतकऱ्याला सांगितले.