दूध दरवाढीसाठी बारामतीत महायुतीचे आंदोलन.
सदर मागणीचे निवेदन तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले.
दूध दरवाढीसाठी बारामतीत महायुतीचे आंदोलन.
दुधाला सरसकट १० रुपये व दूध पावडरला प्रतिकिलो किलो ५० रुपयांचे अनुदान मिळावे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी महायुतीच्या मित्र पक्षांनी एकत्र येत येथील प्रशासकीय इमारतीच्या गेट समोर दगडावर दूध ओतून आंदोलन केले. सदर मागणीचे निवेदन तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले.
तदनंतर आंदोलकांनी बारामती येथील प्रशासकीय भवनाच्या गेट समोर येत दुधाला ३५ रुपये भाव मिळालाच पाहिजे. कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहात नाय, अशी घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात भाजपा तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, रासप तालुकाध्यक्ष अमोल सातकर, रिपाईचे संजय वाघमारे, गोविंद देवकाते, सुधाकर पांढरे रासपचे जिल्ह्याध्यक्ष संदीप चोपडे, भाजपचे शहराध्यक्ष सतिशजी फाळके ,नगरसेवक सुनिल सस्ते,धनंजय गवारे,विजय गव्हाळे,गोविंद देवकाते,प्रमोद खराडे, शामसुंदर पोटरे,रणजित गटकल,उमेश गायकवाड,बापू फणसे, शिवाजी लोणकर,जगदीश कोळेकर, सुधाकर पांढरे,प्रमोद डिंबळे, संजय गिरमे, आदी भाजप, रासप ,रिपाई, शिवसंग्रामचे कार्यकर्ते उपस्थित होते
दरम्यान जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रमुख आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जामिनावर सुटका केली.