पोलीस निरीक्षकांच्या आवाहनाला मेडिकोज गिल्डचा प्रतिसाद
एस.पी ,,डॉ अभिनव देशमुख यांनी मानले आभार
पोलीस निरीक्षकांच्या आवाहनाला मेडिकोज गिल्डचा प्रतिसाद
एस.पी ,,डॉ अभिनव देशमुख यांनी मानले आभार
बारामती वार्तापत्र
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या कर्तव्य भावनेतून समाजामध्ये अनेक विधायक उपक्रम राबवले जातात. असाच एक उपक्रम बारामतीच्या शहरात राबवला जात आहे. तो म्हणजे मिशन सीसीटीव्ही आणि नागरिकही त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत. बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून बारामती शहराची वाटचाल भयमुक्त शहराकडे आणि सुरक्षित शहराकडे सुरू आहे. वाढत्या चोर्या, इतर गुन्हे यासाठी बारामती शहरचे पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्या संकल्पनेतून बारामतीमध्ये लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे देण्याचे आवाहन करण्यात आले आणि मग लोकांनीही ही मोहीम उचलून धरली.
मेडिकल गिल्ड चे डॉअशोक तांबे, अध्यक्ष डॉ संजय पुरंदरे ,उपाध्यक्ष डॉ राजेंद्र चोपडे ,सचिव डॉ तुषार गदादे,सहसचिव डॉ सुहासिनी सोनवले, डॉ चंद्रकांत पिल्ले आणि आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे प्रमुख डॉ सुजित आडसूळ यांनी 61 हजार रुपयाची मदत कॅमेऱ्यासाठी करण्याचे जाहीर केले. आणि ती मदत पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्याकडे पोहोच देखील केली.
पोलिस अधीक्षकांनी स्वतः फोन करुन मानले आभार
मेडिकोज गिल्ड चे सर्व डॉक्टर सदस्यांचे या उपक्रमास साथ दिल्याबद्दल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी फोनवरून सर्व सदस्यांचे कौतुक केले व आभार व्यक्त केले.
दानशूर व्यक्तींनी पुढे यावे
बारामती शहर पोलीस स्टेशन च्या वतीने या उपक्रमास मदत करण्याचे आवाहन केले आहे.यासाठी समाजातील सर्व दानशूर व्यक्ती, संघटना ,सामाजिक संघटना ,गणेश मंडळे, यांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे कारण या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची अत्यंत गरज आहे. याच्या माध्यमातून गुन्हेगारी कमी होण्यास निश्चित प्रकारे मदत होईल व वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात सहकार्य होणार आहे. त्यामुळे समाजातील सर्वांनी पुढे येत आपलाही खारीचा वाटा यामध्ये द्यावा