देशपांडे विद्यालयात क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
कराटे मध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त केलेल्या श्रुती करळे या विद्यार्थिनीला गौरवण्यात आले.

देशपांडे विद्यालयात क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
कराटे मध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त केलेल्या श्रुती करळे या विद्यार्थिनीला गौरवण्यात आले.
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै.ग.भि.देशपांडे विद्यालयात ४६ व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
प्रमुख अतिथी उद्योजक चंद्रकांत वांझखडे व सुदाम कुताळ यांचे हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन खेळाडूंचे कौतुक करण्यात आले. कराटे मध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त केलेल्या श्रुती करळे या विद्यार्थिनीला गौरवण्यात आले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये शरीर निरोगी रहावे यासाठी मैदानाचा उपयोग करून खेळात सातत्य ठेवून प्राविण्य मिळवत रहा असे आवाहन करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपमुख्याध्यापक राजाराम गावडे,पर्यवेक्षक शेखर जाधव,दिलीप पाटील,जयश्री शिंदे, क्रीडा कार्याध्यक्ष प्रशांत सोनवणे, स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष दत्तात्रय शेरखाने,विद्यार्थी प्रतिनिधी स्वरम जाधव,शिवांजली साळुंके आदींनी यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले.
यानिमित्ताने मएसो परिवाराचे
सर्व पदाधिकारी,सल्लागार समिती सदस्य यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या क्रीडा मेळाव्याचे आयोजन कुमार जाधव,दादासाहेब शिंदे व सर्व क्रीडा शिक्षकांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल गावडे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र गडकर यांनी तर आभार प्रशांत सोनवणे यांनी मानले.