देशातील पहिला बायो सीएनजी निर्मितीचा प्रकल्प उभारणार -हर्षवर्धन पाटील
नीरा भीमा कारखान्याची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

देशातील पहिला बायो सीएनजी निर्मितीचा प्रकल्प उभारणार -हर्षवर्धन पाटील
नीरा भीमा कारखान्याची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
इंदापूर: प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथिल निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची सन 2019-20 ची 22 वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर आज रविवारी (दि.21) रोजी सकाळी 11 वा.खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेत सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते. यासभेला कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अभ्यासू असे सविस्तर मार्गदर्शन केले.
देशातील व जगातील साखर उद्योगाचे स्वरूप बदलत चालले आहे. केंद्र सरकारने पाच वर्षासाठी इथेनॉलचे अतिशय चांगले धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे साखर कारखान्यापुढे आगामी काळात साखरेचे उत्पादन कमी करून इथेनॉलचे उत्पादन वाढविण्याची संधी आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात दिली.
केंद्र सरकारने 60 लाख मे.टन साखर निर्यातीस परवानगी दिलेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्रिगटाचे अध्यक्ष अमित शहा यांचे हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले.यावेळी ऑनलाईन वार्षिक सभेचे व कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांचे भाषण झाले. या वार्षिक सभेस पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, विलास वाघमोडे, कृष्णा यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रताप पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, चंद्रकांत भोसले, राजेंद्र गायकवाड, शिवाजी शिंदे, शंकर घोगरे, नामदेव किरकत उपस्थित होते. सभेत अहवाल वाचन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी मानले.
देशातील पहिला बायो सीएनजी निर्मितीचा प्रकल्प उभारणार -हर्षवर्धन पाटील
नीरा भीमा सहकारी साखर कारखाना देशातील सहकारी तत्त्वावरील पहिला बायो सीएनजी गॅस निर्मितीचा प्रकल्प वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने आगामी वर्षात उभारणार आहे, अशी माहिती या ऑनलाइन सभेत बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी दिली.