कोरोंना विशेष

लॉक डाऊन मुळे बारामतीच्या व्यापाऱ्यांची व ग्राहकांची बदलती जीवनशैली ची बातमी वाचा.

लॉकडाऊन मुळे बाजारपेठेची बदलली समीकरण

लॉक डाऊन मुळे बारामतीच्या व्यापाऱ्यांची व ग्राहकांची बदलती जीवनशैली ची बातमी वाचा.

बारामती वार्तापत्र ; लॉकडाऊन च्या वेळे मुळे बारामती मधील व्यापारी व ग्राहकांची जीवनशैली आता बदलली आहे
लॉकडाउनने बाजारपेठेची अनेक समीकरणे बदलून टाकली. १८ मार्चपासून सुरु झालेले लॉकडाउन दोन महिन्यांहून अधिक काळ चालले आणि त्याने सगळी गणितेच बदलून टाकली. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक बदल शासकीय स्तरावर अनिवार्य करण्यात आले, सवयीचे गुलाम झालेल्या व्यावसायिक व ग्राहकांनाही यातील काही बदल हवेसे वाटू लागले आहेत. यातीलच एक बदल आहे, दुकाने सुरु आणि बंद होण्याच्या वेळेचा.

बारामतीसारख्या शहरात सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनेक व्यापारी व ग्राहकांनाही आता ही वेळ सोयीची व सुटसुटीत वाटू लागली आहे. फक्त सायंकाळी पाचऐवजी सातपर्यंत वेळ वाढवावी व नऊ ते संध्याकाळी सात, अशी वेळ सरकारनेच कायम ठेवावी, सात वाजता अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच दुकाने बंद करावीत, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

या नव्या जीवनशैलीमुळे व्यावसायिकांना कुटुंबियांना पुरेसा वेळ देता येत आहे, रात्रीचा वेळ कमी झाल्याने आपोआपच विजेच्या बिलातही बचत होत आहे. संध्याकाळी जे काही गैरप्रकार होतात, त्यालाही आपोआपच आळा बसला असून, लोकही ठरलेल्या वेळेत येऊन खरेदी करुन जात असल्याने या वेळा आता सर्वांनाच सोयीच्या वाटू लागल्या आहेत.

बाजारपेठेवरचा ताणही या वेळांमुळे आपोआपच कमी होऊ लागला आहे. त्यामुळे या पुढील काळातही कायमस्वरुपीच अशी व्यवस्था व्हायला हवी, या बाबत व्यापाऱ्यांचे मत विचारात घेऊन रचना निश्चित केली जावी, असाही सूर आहे.

सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचऐवजी ही वेळ सातपर्यंत वाढवावी. नवीन वेळा सोयीस्कर वाटत आहेत, वेळेत व्यापारी घरी जात आहेत, एरवी रात्री नऊ आणि दहा वाजेपर्यंतही व्यवसाय सुरु राहायचे. आता सर्वांनाच कुटुंबाना वेळ देता येत आहे.
नरेंद्र गुजराथी,
अध्यक्ष, बारामती व्यापारी महासंघ

संध्याकाळी सातपर्यंत जर दुकाने सुरु ठेवली गेली, तर विजेच्या बिलात बचत होईल व त्याचा फायदा व्यापाऱ्यांना होईल. ग्राहकांनाही वेळेत खरेदी करण्याची सवय लागेल व दुकानातील कर्मचाऱ्यांनाही वेळेत घरी जाता येईल.
आनंद छाजेड, सम्यक लाईफ स्टाईल, बारामती

वेळे मध्ये खरेदी करण्याची सवय होते व बारामती शहरात खरेदी साठी येण्याचे योग्य नियोजन करता येते असे मत पाहुणेवाडी चे ग्राहक महेश तावरे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!