दोनशे नव्वद किलोमीटर सायक्लिंग प्रवास करत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
पर्यावरण संवर्धनाचे फलक दर्शवित केला प्रवास
दोनशे नव्वद किलोमीटर सायक्लिंग प्रवास करत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
पर्यावरण संवर्धनाचे फलक दर्शवित केला प्रवास
इंदापूर:सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी त्यांच्या नायगाव
(ता.खंडाळा,जि.सातारा) या जन्मगावी जावून त्यांना
अभिवादन करण्याच्या इच्छेखातर इंदापूर सायकल क्लबच्या दोन सदस्यांनी तब्बल २९० किलोमीटरचा सायकल प्रवास करुन आपली मनोकामना पूर्ण केली.
रमेश शिंदे व ह.भ.प.दशरथ महाराज भोंग अशी त्यांची नावे आहेत.विशेष म्हणजे शिंदे यांचे वय ४० वर्षे तर भोंग यांचे वय ५२ वर्ष आहे.सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनादिवशी(दि.३)सकाळी पहाटे पाच वाजता इंदापूर नगरपरिषद मैदानावरील छ. शिवराय व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे दर्शन घेऊन या दोघांनी नायगावला जाण्यासाठी सायकल प्रवासास प्रारंभ केला.इंदापूर,बारामती,फलटण,लोणंद, शिरवळ फाटा मार्गे नायगाव असे १४२ किलोमीटरचे अंतर पार करत दुपारी एक वाजता ते सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी पोहोचले.त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले.थोडी विश्रांती घेतल्यानंतर दुपारी अडीच वाजता त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला.रात्री सव्वा अकरा वाजता ते इंदापूरातील संविधान चौकात पोहचले.इंदापूर सायकल क्लबच्या सदस्यांनी हार फुले व फेटा बांधून त्यांचे स्वागत केले.
इंदापूर सायकल क्लबची सदस्य संख्या दीडशे आहे.ह.भ. प.भोंग यांनी मागील तीन वर्षांपूर्वी ह्रदयविकाराच्या दुखण्यावर मात केली आहे.गेल्या दोन वर्षांपासुन ते दररोज सुमारे तीस किलोमीटर सायकलिंग करतात.रमेश शिंदे यांनी तंदुरुस्ती कायम ठेवली आहे.इंदापूर ते नायगाव या प्रवासादरम्यान पर्यावरण विषयक जनजागृती करण्यासाठी पर्यावरण संवर्धनाचे फलक सायकलींना डकवण्याची संकल्पना त्यांनी राबवली होती.
शरीर निरोगी व मन आनंदी ठेवल्यास इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद निर्माण आपण स्वतःमध्ये निर्माण करु शकतो हा संदेश आम्हाला या उपक्रमाद्वारे द्यायचा होता,असे या दोघांनी सांगितले.