दोन म्हशींची इंदापूर येथून चोरी
दोन्हीही गाभण म्हशी चोरीला

दोन म्हशींची इंदापूर येथून चोरी
दोन्हीही गाभण म्हशी चोरीला
इंदापूर प्रतिनिधी –
शहरातील व्यंकटेश नगर परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दारासमोर बांधलेल्या दोन म्हशी चोरून नेल्याची घटना घडली.
या प्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत श्याम हिरा सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि.15) रात्री दहा वाजता व्यंकटेशनगर येथे घरासमोर बांधलेल्या दोन्ही म्हशीला फिर्यादीने चारापाणी केला. मात्र, त्यानंतर गुरुवारी पहाटे पाच वाजता जनावरांना चारा पाणी व साफसफाई करण्यासाठी पाहिले असता बांधलेल्या ठिकाणी म्हशी दिसून आल्या नाहीत. घराच्या आजूबाजूला परिसरात म्हशी सुटून गेले आहेत ही काय, हे पाहण्यासाठी त्यांनी व पत्नी सोनाली यांनी शहर व परिसरात जाऊन शोध घेतला, मात्र त्या आढळून आल्या नाहीत. यावरून एक तांबूस रंगाची अर्ध शेपूट तुटलेली चार वर्षे वयाची जाफराबादी मुऱ्हा व दुसरी काळ्या रंगाची चार वर्षाची अशा दोन्हीही गाभण म्हशी चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.