दोन वर्षांनंतर यंदा मोठ्या थाटामाटात आषाढी वारी,या दिवशी संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार
देहू संस्थांनने आषाढी वारीची घोषणा केली आहे.

दोन वर्षांनंतर यंदा मोठ्या थाटामाटात आषाढी वारी,या दिवशी संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार
देहू संस्थांनने आषाढी वारीची घोषणा केली आहे.
बारामती वार्तापत्र
कोरोनामुळे दोन वर्षे वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही. मात्र, परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला.
दोन वर्षांनंतर यंदा मोठ्या थाटामाटात आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी उत्सुक आहेत. आषाढी वारीची गावागावात वारकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे. आता या सर्वांना संत तुकाराम तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाची आणि विठोबाच्या चरणी माथा टेकविण्याची आस लागली आहे.
जगतगुरु संत तुकोबारायांची पालखी २० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. देहू संस्थानने पालखी सोहळ्याची घोषणा केलीय. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून हा पायी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला नव्हता. आता पुन्हा एकदा वारी होणार असल्याने तुकोबााची पालखी २० जूनला देहूतून निघणार आहे. या पालखी सोहळ्यात एकूण ३२९ दिंड्या सहभागी होतात. यंदा ही पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असेल. पायी प्रवास पूर्ण करून पालखी ९ जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचेल. तर १० जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीही आळंदी इथून 21 जूनला प्रस्थान करणार आहे.