दौंड

दौंडचे आमदार राहुल कुल कोरोनामुक्त झाले असुन  तिसरी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

कुल यांची तिसरी चाचणी घेतली असता, ती निगेटिव.

दौंडचे आमदार राहुल कुल यांची कोरोनावर मात; दौंड व हवेली तालुक्यात आनंद

दौंडचे भाजपा आमदार राहूल कुल यांनी १५ दिवस कोरोना या महाभंयकर विषाणू ची यशस्वी लढा दिला. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असून ते कोरोना मुक्त झाले आहेत. याबाबत आमदार कुल यांनी स्वतः फेसबुकवर याची माहिती दिली आहे.

७ जुलै रोजी आमदार कुल यांना कोरोनाची लागण झाली होती. याबद्दल त्यांनी सोशल मिडीयात माहिती दिल्यानंतर दौंड आणि हवेली तालुक्यातील कार्यकर्त्यांना धक्का बसला होता. त्यावेळी काळजी करू नका, मी पुन्हा तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी लवकर बरे होवून येईल अशी पोस्ट करत राहुल कुल यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला होता.

आमदार कुल यांनी दौंडमधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबद्दल शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दौंड शहरासह तालुक्यात सातत्याने बैठका घेऊन संसर्ग कसा आटोक्यात आणता येईल, दक्षता व खबरदारी म्हणून काय उपाय योजना करता येतील यासंदर्भात चर्चा केली होती. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी समन्वय साधत दौंडकरांची कोरोनातून मुक्तता व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

या दरम्यान, आमदार राहुल कुल यांनाच कोरोनाची लागण झाली. त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्या प्रकृतीसाठी कार्यकर्त्यांनी परमेश्वराला साकडे घातले. 15 दिवसांच्या उपचारानंतर राहुल कुल हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे दौंडसह हवेली तालुक्यातील त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, आपण लवकरच जनतेच्या सेवेसाठी संपूर्ण ताकदीने कार्यरत होत असून दौंडमधील कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राहुल कुल यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!