दौंडचे आमदार राहुल कुल यांना कोरोनाची लागण.
स्वतः अधिकृत फेसबूक पेज वर दिली माहिती.
यवत:-प्रतिनिधी
दौंड तालुक्याचे भाजपचे आमदार राहुल कुल यांना कोरोनाची लागण झाली आहे.आमदार राहुल कुल यांनी स्वतःहा या बाबत आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन ही माहिती दिली आहे.
आ.कुल यांच्या कुटुंबियांची देखील तपासणी करण्यात आली असून यात सर्व कुटुंबियांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली आहे. आमदार कुल यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी करून घेतली होती त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही असा संदेश त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला दिला आहे.