दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे नवरा नवरीसह १७ जण कोरोना बाधित.
कोरोना आणतोय लग्नात विघ्न, कासुर्डीनंतर पिलाणवाडीत सहा जणांना बाधा, शहरातही दोन नवे रुग्ण.
दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे नवरा नवरीसह १७ जण कोरोना बाधित.
कोरोना आणतोय लग्नात विघ्न, कासुर्डीनंतर पिलाणवाडीत सहा जणांना बाधा, शहरातही दोन नवे रुग्ण
बारामती वार्तापत्र
दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे नवरा नवरीसह १७ जण कोरोना बाधित झाल्याची घटना ताजी असतानाच आता तालुक्यातील पिलानवाडी येथे एकाच कुटुंबातील सात जणांचा खासगी प्रयोग शाळेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक रासगे यांनी ही माहिती दिली. मागील चौदा ते पंधरा दिवसापुर्वी पिलानवाडी परिसरात विवाह सोहळा पार पडला होता. या विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या एकाच कुटुंबातील व्यक्तींनी पुणे येथील खासगी प्रयोग शाळेत कोरोनाची तपासणी केली होती, त्यात सात व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे.
दरम्यान संबंधित कोरोना बाधित व्यक्तींचा तपासणी अहवाल खासगी प्रयोग शाळेचा असल्याने या सर्वांची शासकीय प्रयोग शाळेत कोरोनाची तपासणी करण्यात येणार आहे. पाटस येथे एका व्यक्तीचा खासगी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, मात्र त्याचा शासकीय प्रयोग शाळेतील अहवाल निगेटिव्ह आला होता, यामुळे पिलानवाडी येथील खासगी अहवाल पॉझिटिव्ह असले तरी या परिसरात पार पडलेल्या विवाह सोहळ्यात आणखी किती जण उपस्थित होते, ते किती जणांच्या संपर्कात आले आहेत याचा शोध आरोग्य विभाग घेणार असून आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. संबंधित कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ रासगे यांनी केले.