दौंड तालुक्यातील पाटस येथे सेक्स रॅाकेटचा पर्दाफाश, एकास अटक;स्थानिक गुन्हे विभागाची कारवाई
अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
दौंड तालुक्यातील पाटस येथे सेक्स रॅाकेटचा पर्दाफाश, एकास अटक;स्थानिक गुन्हे विभागाची कारवाई
अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
दौंड : बारामती वार्तापत्र
दौंड तालुक्यातील पाटस येथील टोल नाक्यावर जवळ अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेणारा एका व्यक्तीस पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केले आहे.
प्रवीण रामदास शिंदे (वय २७ रा.यळपणे ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर ) असे सेक्स रॅाकेट चालवणाऱ्या व अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, पुणे सोलापूर महामार्गवारील पाटस टोलनाक्याजवळ अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी ( दि.7) पुणे सोलापूर महामार्गावर पाटस टोल नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या दक्षिणेस सुलभ शौचालयाचे पश्चिमेस मोकळे जागेत आरोपी अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून प्रवीण शिंदेला पकडले.
प्रवीण शिंदे हा दौंड व परिसरामध्ये वेश्यावसाय करून घेत होता. 17 वर्षीय अल्पवयीन पीडीत मुलगी ही दौंड येथील आहे. या पिडीत मुलीक़ून अनैतिक वेश्याव्यवसाय करून घेत होता. त्याच्याकडून 39 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असून स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहीती घनवट यांनी दिली.
ग्रामिण पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, बारामती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली साह्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक फौजदार सागर चव्हाण, पोलीस हवालदार मुकुंद अयाचीत , महेश गायकवाड, निलेश कदम,उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, लता जगताप, पोलीस नाईक सुभाष राऊत, गुरुनाथ गायकवाड, अक्षय जावळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.