दौंडमध्ये दहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण; दिवसभरात दहा नवे रूग्ण.
दौंड तालुक्यात कोरोना विषाणूचा कहर कायम असून यामध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. आज शहरात प्रथमच आठ महिन्याच्या बाळाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर या बाळासह पाच जणांचा कोरोनाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
शहरातील कोरोना रूग्णाच्या संपर्कातील ५२ जणांचे नमुने काल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी ५१ जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून १ अहवाल प्रलंबित आहे.
या ५१ पैकी पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पंचशील थिएटर परिसरातील चार आणि भिमनगर येथील एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.दौंडच्या ग्रामीण भागातील केडगाव येथे आज पाच नवे कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत. शहरात पाच व ग्रामीण भागात पाच असे दहा कोरोना बाधित नवे रूग्णांची वाढ झाली आहे. यामुळे दौंडकरांची चिंता वाढली असून आरोग्य विभागासह इतर शासकीय यंत्रणेची डोके दु़खी वाढली आहे.