दौंड तालुक्यात बर्ड फ्लु चा शिरकाव !
पोल्ट्री व्यवसायिक धास्तावले
बारामती वार्तापत्र
मागील एक वर्षापासून पोल्ट्री व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात अडचणी चा सामना करावा लागत होता आणि आता बर्ड फ्लूचा शिरकाव दौंड तालुक्यात झाल्यामुळे चिंता अजूनच वाढली आहे.
कोवीड 19 मूळे मार्च महिन्यापासून कोंबड्या मुळे कोरोना पसरतो अशी अफवा सर्वदूर पोहोचली होती. त्यामुळे जिवंत कोंबड्या ही काही ठिकाणी गाडल्या जात होत्या तर काही ठिकाणी अगदी दहा रुपयाला ही एक कोंबडी याप्रमाणे विक्रीही केली जात होती. या दुष्टचक्रातून सावरत असतानाच नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये पोल्ट्री व्यवसायिकांना बऱ्यापैकी चांगले दिवस आले होते.
मात्र आता बर्ड फ्लू ( एव्हीएन इन्फ्लुएन्झा ) विषाणूचा प्रसार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीबेल या गावापर्यंत आला बोरिबेल गावातील अवचर वस्ती येथील काकासाहेब बापूराव आटोळे यांच्या पन्नास गावरान कोंबड्या पैकी दहा कोंबड्या मृत झाल्या होत्या. त्यामुळे त्यातील दोन कोंबड्या भोपाळ येथे परीक्षणासाठी पाठविण्यात आल्या होत्या. या कोंबड्या बर्ड फ्लू ने मरन पावल्याचा प्रयोगशाळेकडून अहवाल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी या शेतकऱ्याच्या आणखी तीस कोंबड्या मेल्यामुळे बर्ड फ्लू झाल्याचे प्रयोगशाळा अहवालावरून निष्पन्न झाले आहे.
दहा किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात निगराणी क्षेत्र घोषित केले आहे व खबरदारी म्हणून कुकुट वर्गीय पक्ष्यांची खरेदी विक्री वाहतूक ,जत्रा . बाजार, प्रदर्शन आधी गोष्टींवर बंदी घालण्यात आली असून या भागात एकवीस दिवस प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या भागात बर्ड फ्लू अहवाल आल्याने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या क्षेत्रातील सर्व कुकुटपालन पक्ष्यांची व अंडी, खाद्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट करण्यासाठी शीघ्र कृती दलास आदेश दिले आहेत. या बाधित कोंबड्या जेसीबीच्या साह्याने खड्डा घेऊन निर्जंतूक करून विघटन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.