क्राईम रिपोर्ट

दौंड येथील इलेक्ट्रीक साहित्य चोरीचा गुन्हा उघडकीस : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कामगिरी

२६ नग किंमत रूपये ८७,०७४/- असा मुद्देमाल

दौंड येथील इलेक्ट्रीक साहित्य चोरीचा गुन्हा उघडकीस : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कामगिरी

२६ नग किंमत रूपये ८७,०७४/- असा मुद्देमाल

क्राईम ; बारामती वार्तापत्र

दौंड तुकाईनगर येथील शेडमधून लाईट व केबल असा इलेक्ट्रीक साहित्य चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने उघडकीस आणून दोघांना जेरबंद करून त्यांचेकडून सुमारे ८७ हजार रुपयाचा माल हस्तगत केल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

दिनांक १५/०५/२०२१ रोजी १८.०० ते दि.१६/०५/२०२१ रोजी १६.०० वा.चे दरम्यान दौंड तुकाईनगर येथील लोकाशेड येथे शिवराम इलेक्ट्रिकल या कंपनीचे शेडमध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने मोकळ्या जागेतून प्रवेश करून बजाज कंपनीचे एल.ए.डी. लाईट, केबल असा एकुण ३,०५,४४३/- (तीन लाख पाच हजार चारशे त्रेचाळीस) रूपयाचा मुददेमाल चोरून नेले बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दौंड पोलीस स्टेशन गु.रजि. नंबर २८१/२०२१ भा.द.वि. का.क. ४६१, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले पथक करीत असताना त्यांनी घटनास्थळी भेट देवून गुन्हा घडलेले आजूबाजूचे ठिकाणचे सी.सी. टि.व्ही फुटेज प्राप्त करून घेतले. गोपनिय बातमीदार यांना सी.सी.टि.व्ही. फुटेज दाखविले असता त्यांचेकडून माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा भिमनगर दौंड येथील ऋषीकेश फासगे, सोमनाथ ढवळे, शहानु कमाने व आणखीन एक यांनी केलेला आहे. त्या माहितीवरून त्यांचा शोध शोध घेऊन मिळून आलेले आरोपी नामे –
१) ऋषीकेश माणिक फासगे वय १९ वर्षे रा.सम्राटनगर, दौंड जि.पुणे
२) सोमनाथ जगन्नाथ ढवळे वय २२ वर्षे रा.भिमनगर, दौंड जि.पुणे तसेच एक विधिसंघर्षित बालक
यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचा आणखीन एक साथीदार शहानू क्रमाने रा . भीमनगर दौंड साथीदार याच्या मदतीने सदरचा चोरीचा गुन्हा केल्याचे सांगितले आहे.
आरोपी नं.१ याचे ताब्यात त्यांनी गुन्हयात चोरी केलेले बजाज कंपनीचे एल.ए.डी. लाईट चे एकुण २६ नग किंमत रूपये ८७,०७४/- असा मुद्देमाल मिळुन आला. तो पंचनाम्याने ताब्यात घेण्यात आलेला आहे. गुन्हयात चोरी केलेली काॅपर वायर ही आरोपींनी विशाल शांतीलाल दुमावल रा.आंबेडकर चौक, दौंड या दुकानदारास विकल्याचे सांगितले आहे.
आरोपी नं. १ व २ यांना ताब्यात घेवून त्यांची वैद्यकीय तपासणी करून दोघे आरोपी व जप्त मुददेमाल दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेला आहे.

सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो., बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राहुल धस सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट,स.पो.नि. सचिन काळे,पोहवा. महेश गायकवाड,पोहवा. निलेश कदम,पोहवा. सचिन गायकवाड,पोहवा. सुभाष राऊत,पो.ना. गुरु गायकवाड यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!