बारामती जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंगमध्ये लागली आग !
आग लागलेल्या परिसरात विद्युत रोहित्र देखील आहे.

बारामती जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंगमध्ये लागली आग !
आग लागलेल्या परिसरात विद्युत रोहित्र देखील आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात असलेल्या झाडांना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. हे चित्र पाहून कार्यालयीन अधिक्षक सुभेदार तसेच बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत सोकटे यांनी बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर अग्निशमन दलातील जवानांनी झाडांना लागलेली आग आटोक्यात आणली.
आग वेळीच आटोक्यात आली नसती तर शेजारील दुचाकी तसेच चारचाकी वाहने देखील जळून भस्मसात झाली असती झाली असती, असे ॲड. कुणाल जाधव यांनी सांगितले.
त्यानंतर लागलीच अग्नीशमन यंत्रणा तेथे पोचली. मात्र न्यायालयात जाण्यासाठी असलेल्या दोन्ही रस्त्यावर दुतर्फा वाहने पार्क केलेली असतात, त्यामुळे मोठे वाहन जाण्यासाठी जागाच राहत नाही. त्याही स्थितीतून अग्नीशमन बंबाच्या चालकाने कसरत करून वाहन त्यातून काढले आणि पार्किंगच्या आग लागलेल्या ठिकाणी पोचवले. कर्मचाऱ्यांनी वेगवान हालचाली करून ही आग विझवली. त्यामुळे मोठे नुकसान टळले.
आग लागलेल्या परिसरात विद्युत रोहित्र देखील आहे. तसेच आजूबाजूला सदनिका आहेत. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. अग्निशमन दलातील शैलेश सोनवणे, अक्षय माने, मोहन शिंदे यांनी आग आटोक्यात आणली.