दौंड येथे कोरोनाजन्य परिस्थिती बिकट तर 41 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा.
शहरासह तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ.
दौंड येथे कोरोनाजन्य परिस्थिती बिकट तर 41 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा.
शहरासह तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ.
बारामती वार्तापत्र
दौंड उप जिल्हा रूग्णालयाकडून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कातील 30 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 30 जुलै रोजी आलेल्या अहवालानुसार 21 जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने शहर आणि परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून शहरातील पाटील चौक, शालीमार चौक, जनता काॅलनी, बंगला साइड, पं. नेहरू चौक, गजानन सोसायटी, भवानीनगर व लिंगाळी (ता. दौंड) येथील एकूण नऊ जणांना बाधा झाली असून बाधितांमध्ये 6 पुरूष व 3 महिलांचा समावेश आहे. त्यांचे वय 18 ते 75 दरम्यान आहे, अशी माहिती रूग्णालय अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली.
दौंड शहरातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे विलगीकरण करण्यासाठी नियुक्त पथकातील आणखी एका नगरपालिका आरोग्य कर्मचारीस कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. तालुक्यातील 50 कोरोना संशयित नागरिकांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले व त्यापैकी तब्बल 41 जणांचा वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.
दौंड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अग्रभागी असलेल्यांना उपजिल्हा रूग्णालयातील एका महिला कर्मचारी, नगरपालिकेच्या विलगीकरण पथकातील आरोग्य कर्मचारी आणि एका 40 वर्षीय खासगी रूग्णवाहिका चालकास 20 ते 24 जुलै या काळात बाधा झालेली आहे. तर, 30 जुलै रोजी (पीपीई) घालून बाधित नागरिकांचे विलगीकरण करणाऱ्या 31 वर्षीय कर्मचाऱ्यास बाधा झाली आहे. सदर बाधित नगरपालिका कर्मचारी नगरपालिकेच्या आरोग्य पथकात लॅाकडाउन जाहीर झाल्यापासून सक्रियपणे नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि बाधितांचे विलगीकरण करण्याच्या कार्यात होता.