दौड येथे गावठी पिस्तुल आणि १ जिवंत काडतुस जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
दौड येथे गावठी पिस्तुल आणि १ जिवंत काडतुस जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बारामती वार्तापत्र
मा पोलिस अधिक्षक श्री अभिनव देशमुख सो यांनी अवैधशस्त्र बाळगणारे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते त्यावरून आज रोजी दि ११/११/२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दौड पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते .सदरच्या पथकास गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमी वरून मौजे देऊळगाव राजे येथील छत्रपती चौकात एक इसम आपल्या कम्बरेला गावठी पिस्तुल लावून उभा असल्याचे कळाले वरून त्याठिकाणी सदर पथकाने जाऊन वरील इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या डाव्या कंबरेला बेल्टच्या आत एक लोखंडी वस्तू हाताला लागली सदरची वस्तू बाहेर काढून पाहिली असता सदरची वस्तू ही गावठी पिस्तुल असल्याचे समजले सदरील व्यक्तीचे अधिक झडती मध्ये पॅन्ट च्या डाव्या खिश्यात एक जिवंत काडतुस मिळून आले सदरील व्यक्तीचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश उर्फ आबा बाबासो म्हस्के वय 30 वर्षे रा देऊळगाव राजे मारुती मंदिर शेजारी ता दौड जि पुणे सदरील इसमास ताब्यात पुढील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला
१) ४५००० रु किंमतीचे एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल मॅगजिन सह ,२) १०० रु किंमतीचे एक जिवंत काडतुस असा एकूण ४५१०० रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावरून दौड पोलिस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) मुंबई पोलिस अधिनियम १५१ चे कलम१३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुद्देमाल सह पुढील तपास कामी दौड पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे .
सदरची कारवाई ही मा पोलिस अधिक्षक श्री अभिनव देशमुख सो अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय अधिकारी सुहास धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे ,पो हवा अनिल काळे,पो हवा रविराज कोकरे, पो ना अभिजित एकशिंगे,पो ना विजय कांचन
पो कॉ धिरज जाधव तसेच दौड पोलिस स्टेशन चे पो हवा शेख
पो ना सचिन बोराडे पोना बापू रोटे यांनी केली आहे.