दौड शहर कोरोना धोक्यात.
एकावेळी कुटूंबातील 5 जणांना कोरोना संसर्ग,
दक्षता घेण्याची प्रशासनाची सूचना
बारामती:वार्तापत्र दौड शहरात एकाच वेळी एकाच कुटूंबातील 5 जणांना कोरोना संसर्ग झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दौंड शहरात आज (शनिवार 13 जून ) एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना कोरोनाची बाधा झाली
असून एक वयोवृद्ध महिला देखिल कोरोना बाधित आढळून आली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानानंतर सामान्यांमधील कोरोनाचा
उद्रेक चिंतेचा बनला आहे. दौंडमध्ये पाच जणांचा बळी गेल्यानंतरही लोकांमधील
बेफिकीरी कायम आहे.
आज दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे
अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी ही माहिती दिली. कोरोना विषाणूचा कहर दौंड
शहरात असून त्याचा रूद्रावतार दररोज दिसू लागला आहे. दौंड शहरात आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या
78 वर पोचली असून शहरात अँक्टिव्ह रुग्णांची संख्या पंचविशीत आहे. दरम्यान दौंड शहरातील कोरोना बाधित
रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २३ जणांची दोन दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने कोरोनाची तपासणी केली होती. यातील
२२ जणांचे वैद्यकीय अहवाल आज आले.
त्यातील ६ जणांचा वैद्यकीय अहवाल
पॉजिटीव्ह आला आहे. यामध्ये एकाच
कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे.
या ६ कोरोना बाधितामध्ये ६५ वर्षाच्या
वयोवृद्ध महिलेसह १३ ते १७
वयोगटातील अल्पवयीन मुले व मुलींचा
समावेश आहे.
कोरोनाला गांभियाने न घेणाया
दौंडकरांवर कोरोनाचे संकट येत्या
काळात अधिकच वाढू शकते यामुळे
दौंडकरांनी सावध होऊन काळजी
घेण्याची आवश्यकता आहे. गेली चार
दिवस दौंडमध्ये दररोज कोरोनाचे रूग्ण
आढळत आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब
आहे.