पुणे

धक्कादायक घटना टिकटॉक स्टार समीर गायकवाड आत्महत्या 

समीर पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिकत होता.

धक्कादायक घटना टिकटॉक स्टार समीर गायकवाड आत्महत्या 

समीर पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिकत होता.

पुणे : बारामती वार्तापत्र रिपोर्ट

टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने रविवारी घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. प्रेमप्रकरणातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.

पुणे शहरातील वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत टिकटॉक स्टार समीर मनीष गायकवाड (वय 22) रहात होता. तिथे त्याने रविवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला साडीच्या मदतीने गळफास लावला, अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

समीरने आत्महत्या केल्याचं कळताच प्रफुल्ल गायकवाडने लोणीकंद पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर समीरला खाली उतरवून तात्काळ लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

समीर पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिकत होता. तो म्युझिक व्हिडीओ आणि शॉर्ट व्हिडीओ बनवायचा. तो टिकटॉक स्टार म्हणूनही तरुणांमध्ये लोकप्रिय होता.

कोण होता समीर गायकवाड?

समीर गायकवाड हा Tik Tok या अॅपवर अतिशय लोकप्रिय होता. 22 वर्षीय त्याला हजारो लोक Tik Tok वर फॉलो करायचे. अनेक प्रकारचे व्हिडीओ तयार करुन तो Tik tok वर अपलोड करायचा. त्याचे व्हिडीओ नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरायचे. याशिवाय समीर गायकवाडच्या इन्स्टावरही तुफान फॉलोअर्स होते. इन्स्टावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या 2 लाख 80 हजार इतकी आहे.

‘रेड लाईट डायरी’जचे समीर गायकवाड वेगळे

दरम्यान, काही माध्यमं आत्महत्या केलेले समीर गायकवाड हे ‘रेड लाईट डायरीज’चे लेखक असल्याचं म्हणत आहेत. मात्र लेखक समीर बापू आणि टिकटॉक स्टार समीर गायकवाड हे दोन्ही वेगळे आहेत. पुण्यात आत्महत्या केलेल्या समीर गायकवाडने अशी कुठलीही सिरीज किंवा ब्लॉग लिहिला नाही. तो केवळ Tik tok व्हिडीओ बनवायचा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram