शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था जगाला प्रेरणादायी : विश्वास पाटील
सूत्रसंचालन संतोष नरुटे यांनी केले.

शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था जगाला प्रेरणादायी : विश्वास पाटील
सूत्रसंचालन संतोष नरुटे यांनी केले.
इंदापूर; प्रतिनिधी
“छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था, नियोजन हे जगाला प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांना फार कमी आयुष्य मिळाले, आणखी दहा वर्षे जरी त्यांना आयुष्य मिळाले असते तर भीमा नदी, कृष्णाकाठची घोडी त्यांनी लंडनच्या थेम्स नदीकाठी नाचवली असती,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
इंदापूर शहर शिवजयंती उत्सव समिती आयोजित मालोजीराजे व्याख्यानमालेत ‘शिवरायांच्या जीवनातील अज्ञात व अपूर्वक रोमहर्षक घटना’ या विषयावर आयोजितव्याख्यानप्रसंगी विश्वास पाटील बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र तांबिले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब मोरे, गजानन गवळी उपस्थित होते.
या वेळी उपस्थितांचे स्वागत मालोजीराजे व्याख्यान समितीचे अध्यक्ष कैलास कदम व सुनील गलांडे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष नरुटे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी शरद झोळ, योगेश गुंडेकर, अनिकेत साठे, विशाल गलांडे, तुषार हराळे, अमोल खराडे, दत्तराज जामदार, संदीपान कडवळे, रमेश शिंदे, अमोल साठे, सचिन जगताप, ओम जगताप, आदित्य कदम यांनी प्रयत्न केले.